''पुणे डायबेटिक रन''ला उस्फुर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''पुणे डायबेटिक रन''ला उस्फुर्त प्रतिसाद
''पुणे डायबेटिक रन''ला उस्फुर्त प्रतिसाद

''पुणे डायबेटिक रन''ला उस्फुर्त प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे डायबेटिक रनला
उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, ता. २१ : पुणे डायबेटिक रनला पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात २५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले. तीन कलोमीटर धावलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्यापासून ते पाच किलोमीटर धावलेल्या ८२ वर्षांच्या नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशा तीन गटात ही धावण्याची स्पर्धा घेण्यात आली.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, अभिनेत्री विभावरी देशपांडे, श्रीरंग गोडबोले, कॉम्रेड्स मॅरेथॉन व विविध आयर्नमॅन स्पर्धेत बाजी मारणाऱ्या समृद्धी कुलकर्णी, आयर्नमॅन उमेश रानडे आणि ट्रायथलेट व लंडन-एडिनबर्ग-लंडन (एलईएल) २०२२ फिनिशर किरीट कोकजे यांनी देखील पुणे डायबेटिक रनमध्ये भाग घेतला. अलोहा क्लिनिक्सच्या संस्थापिका व संचालिका डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, ‘‘निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करण्यावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यात पुणे डायबेटिक रन खूप मोठे योगदान ठरेल.’’
जीवनशैलीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे अलोहा क्लिनिक्स आणि महिलांचे आरोग्य व स्वच्छता यासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था कपिला नारी यांनी संयुक्तपणे पुणे डायबेटिक रनचे आयोजन केले होते.