कर्मचाऱ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी कंपन्यांनी प्राधान्य द्यावे ः कुलकर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी 
कंपन्यांनी प्राधान्य द्यावे ः कुलकर्णी
कर्मचाऱ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी कंपन्यांनी प्राधान्य द्यावे ः कुलकर्णी

कर्मचाऱ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी कंपन्यांनी प्राधान्य द्यावे ः कुलकर्णी

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : साथीचा रोग आणि मंदीचा धोका यामुळे लोकांच्या तणावाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यासाठी संस्था आणि कंपन्यांमधील संसाधन विभाग प्रमुखांनी कर्मचाऱ्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपक्रम आणि कर्मचारी साहाय्य कार्यक्रम विकसित करावेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. चारुलता कुलकर्णी यांनी केले.

वडगावशेरीतील ख्रिस्त कॉलेज येथे ‘करंट ट्रेंड्स इन एचआर मॅनेजमेंट आणि लेबर वेल्फेअर या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. प्रा. कुलकर्णी बोलत होत्या. कुलकर्णी म्हणाल्या, साथीच्या रोगाने कर्मचारी आरोग्य आणि निरोगीपणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कर्मचाऱ्यांना कुटुंबाची, त्यांच्या आरोग्याची आणि बाजारातील अस्थिरतेमुळे नोकऱ्या धोक्यात येतील, याची चिंता असते. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि आरोग्य धोरणास प्राधान्य देणे गरजेचे आहे. सर्वोत्तम कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना करिअरचे टप्पे आणि वाढ याची अपेक्षा असते. ते देण्यासाठी संस्थांनी यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संतोष लाल यांनी केले. ख्रिस्त कॉलेजचे संचालक प्रा. डॉ. अरुण अँटनी चुल्ली आणि प्रा.दीपा सुजित हे उपस्थित होते. पूजा पाटील यांनी आभार मानले.