‘बालग्राम’तर्फे सांस्कृतिक पदयात्रेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बालग्राम’तर्फे सांस्कृतिक पदयात्रेचे आयोजन
‘बालग्राम’तर्फे सांस्कृतिक पदयात्रेचे आयोजन

‘बालग्राम’तर्फे सांस्कृतिक पदयात्रेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः महाराष्ट्रातील वैभवशाली किल्ले, लेणी आणि ऐतिहासिक वास्तूबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणून संपर्क बालग्राम या संस्थेच्या वतीने ‘सांस्कृतिक पदयात्रेचे’ (हेरिटेज वॉक) आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजकुमार सिंह, जनसंपर्क प्रमुख प्रदीप वाडेकर उपस्थित होते.

या पदयात्रेत सुमारे साडेतीन किलोमीटरचे अंतर चालत विसापूर व लोहगड किल्ले, भाजे लेणी, बेडसे लेणी आणि अशा चार ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यात येणार आहे. याद्वारे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. ही पदयात्रा १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता भाजे लेणीच्या पायथ्याजवळून ध्वजवंदन करून सुरू होणार आहे. या पदयात्रेमध्ये ३२ प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे.