बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचा बेमुदत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाईक टॅक्सीविरोधात
रिक्षाचा बेमुदत बंद
बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचा बेमुदत बंद

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचा बेमुदत बंद

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः पुण्यात चालू असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने येत्या २८ ऑक्टोबरपासून पुणे व पिंपरी चिंचवड येथे बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे. तसेच पुणे आरटीओसमोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये बेकायदा बाईक टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येण्याबरोबरच कायदेशीररीत्या व्यवसाय करणाऱ्या सव्वालाख रिक्षा चालकांचे उत्पन्न धोक्यात आले आहे. गेल्या वर्षभरात सर्व अधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडून ही याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन सोमवारी (ता. २८) सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. या आंदोलनाला पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध रिक्षा संघटन पाठिंबा देत सहभागी होणार आहे. यामध्ये मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष किशोर चिंतामणी, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर, वाहतूक आघाडी युनियनचे अध्यक्ष अजीज शेख, एआयएमआयएम रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सय्यद आदी सहभाग घेणार आहेत, असे यावेळी डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.