मद्यधुंद पोलिसांचा धिंगाणा; हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मद्यधुंद पोलिसांचा धिंगाणा;
हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण
मद्यधुंद पोलिसांचा धिंगाणा; हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण

मद्यधुंद पोलिसांचा धिंगाणा; हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः रात्रीच्यावेळी हॉटेल बंद झालेले असतानाही शहर पोलिस दलातील तीन पोलिसांनी दारूची मागणी करून मद्यधुंद अवस्थेतच हॉटेलच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकाराची दखल घेत मुंढवा पोलिसांनी संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवारी (ता. २१) रात्री सव्वाएकच्या सुमारास मुंढवा येथे घडली.
पोलिस कर्मचारी उमेश मरीस्वामी मठपती (वय २९, रा. सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव (वय ३७, रा. भवानी पेठ), योगेश भगवान गायकवाड (वय ३२, रा. केशवनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक कुणाल दशरथ मद्रे (वय २७, रा. घोरपडी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी मठपती हा फरासखाना पोलिस ठाण्यात, पोलिस कर्मचारी जाधव हा समर्थ वाहतूक विभागात तर पोलिस कर्मचारी गायकवाड हा चंदननगर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. घोरपडी गावात एका हॉटेलमध्ये मद्रे हे व्यवस्थापक आहे. सोमवारी रात्री मद्रे हे हॉटेल बंद करून त्यांच्या कर्मचाऱ्यांसमवेत उर्वरित कामे करीत होता. त्यावेळी मठपती, जाधव व गायकवाड हे तिघेजण हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलच्यामध्येच दारू घेतली. त्यानंतर त्यांनी आणखी दारूची मागणी केली. तसेच शिवीगाळ करीत हॉटेलमधील रोहित काटकर यास मारहाण केली. ‘तुम्ही आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत, आम्ही पोलिस आहोत, तुम्हाला दाखवतो’ असे बोलून शिवीगाळ करीत त्यांनी धमकी दिली. या घटनेची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांना मिळाले. त्यानंतर लकडे हे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तिघांविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.