डिश टीव्ही इंडियातर्फे ‘वॉचो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिश टीव्ही इंडियातर्फे ‘वॉचो’
डिश टीव्ही इंडियातर्फे ‘वॉचो’

डिश टीव्ही इंडियातर्फे ‘वॉचो’

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी पाहण्याची संधी आता उपलब्ध होणार आहे. डिश टीव्ही इंडियाने यासाठी आपल्या ‘वॉचो’ या नव्या प्रॉडक्टची घोषणा केली आहे.
‘वॉचो’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर यापूर्वी विविध ओरिजनल कंटेंट पाहायला मिळायचा. आता मात्र या प्लॅटफॉर्मवर काही इतर लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील पाहता येणार आहेत. यामध्ये डिझ्नी प्लस, हॉटस्टार, झी5, सोनी लिव, लायन्सगेट प्ले, हंगामा प्ले, होईचोइ, क्लिक, एपिकऑन, चौपाल आणि ओहो गुजराती या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश असेल. एकाच ठिकाणी सर्व ओटीटी कंटेंट उपलब्ध होत असल्याने ‘वन है तो डन है’ ही ‘वॉचो’ची टॅगलाइन आहे.
याबाबत डिश टीव्ही इंडिया लिमिटेडचे ग्रुप सीईओ अनिल दुआ म्हणाले, ‘‘डीटीएच टेक्नॉलॉजीचे आद्य प्रवर्तक म्हणून डिश टीव्ही इंडियाने भारतीय टेलिव्हिजनचा पट बदलण्यात लक्षणीय भूमिका बजावली. आता जलद गतीने होत असलेले डिजिटायझेशन आणि ग्राहकांची बदलती आवड विचारात घेऊन आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म एकत्र आणून एक पाऊल पुढे टाकत आहोत.’’