क्रिकेटमधील सट्टा बेतला तरुणाच्या जिवावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेटमधील सट्टा बेतला तरुणाच्या जिवावर
क्रिकेटमधील सट्टा बेतला तरुणाच्या जिवावर

क्रिकेटमधील सट्टा बेतला तरुणाच्या जिवावर

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी घेतलेले २८ हजार रुपये परत न केल्याने तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

निखिल ऊर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय ३२, रा. आईसाहेब बिल्डींग, आंबेगाव खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सराईत गुन्हेगार लहू माने (वय ४०), विशाल अमराळे (वय ३५) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निखिल याच्या २४ वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी अमराळे, माने हे निखीलच्या ओळखीचे होते. आरोपींनी निखिल यास क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी २८ हजार रुपये दिले होते. निखिलने त्यांचे पैसे परत न केल्यामुळे आरोपींच्या मनात त्याच्याविषयी राग होता. त्याच कारणावरून सराईत गुन्हेगार माने याने निखिल यास धमकावण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी आरोपींनी निखिलचे बिबवेवाडी भागातून अपहरण करून त्यास डांबून ठेवले होते. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला. त्यावेळी त्यांनी माने व अमराळे या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा, त्यांनी खून केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.