‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मुळे सांधेदुखी होते कायमची बरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मुळे सांधेदुखी होते कायमची बरी
‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मुळे सांधेदुखी होते कायमची बरी

‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मुळे सांधेदुखी होते कायमची बरी

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः सांधेदुखी आणि संबंधित आजार ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मुळे कायमचे बरे होतात, असा रुग्णांचा अनुभव आहे. येथे उपचारांसाठीची औषधे त्या-त्या व्यक्तीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी पाहून स्वतंत्रपणे तयार केली जातात.
डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी आठ वर्षांच्या संशोधनानंतर पुण्यात ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची स्थापना १९९१ मध्ये केली. संधिवातावर उपाय शोधला पाहिजे, या ध्येयाने डॉ. जिनवाला यांनी ही उपचारपद्धती शोधली. तत्पूर्वी त्यांनी १९८७ मध्ये एफडीएकडून परवाना मिळवला होता. आयुर्वेदात सर्वच आजारांवर उपचार आहेत, अशी डॉ. जिनवाला यांचीही हीच भूमिका होती. सांधेदुखीवरही आयुर्वेदाच्या माध्यमातून कायमचे उपचार करता येतील, हा विश्वास त्यांनी ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’च्या माध्यमातून जनमानसात रुजवला.
सुमारे ३७ वर्षांपासून पुण्यात ढोले पाटील रस्त्यावर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची प्रशस्त शाखा आहे. डॉ. मंजूषा अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली ही शाखा वाटचाल करीत आहे. या क्लिनिकमध्ये तयार होणारी औषधं ही त्या-त्या प्रदेशाचा, तिथल्या वातावरण-पर्यावरणाचा विचार करून, साहजिकच त्याचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. तयार झालेल्या औषधांना रुग्णाची प्रतिकारशक्ती, पचनक्षमता, मानसिकस्थिती यांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे, हेही उपचारादरम्यान तपासले जाते. त्यानुसार या औषधांची पुनर्रचना केली जाते.
पुण्यासह मुंबई, सातारा, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतूनही उपचारासाठी रुग्ण ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये येतात. ओपीडी बेसिसवर हे उपचार होत असल्याने महिन्यातून किंवा दोन महिन्यांतून एकदा रुग्णालयात यावे लागते. तपासणीच्या वेळीच त्याला अपेक्षित खर्च किती येईल, हे लिहून दिले जाते. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरू असते.