अधिसभा निवडणुकीत शिनलकर, बस्ते विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिसभा निवडणुकीत शिनलकर, बस्ते विजयी
अधिसभा निवडणुकीत शिनलकर, बस्ते विजयी

अधिसभा निवडणुकीत शिनलकर, बस्ते विजयी

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील दोन जागांचा निकाल बुधवारी पहाटे साडे चारच्या सुमारास जाहीर करण्यात आला. या खुल्या प्रवर्गात भारतीय जनता पक्ष प्रणीत विद्यापीठ विकास मंचचे दादाभाऊ शिनलकर हे दोन हजार ५११ मतांनी, तर महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे बाकेराव बस्ते हे दोन हजार २३० मतांनी निवडून आले आहेत.

विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधर गटातील दहा जागांपैकी आठ जागांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला तर उर्वरित दोन जागांवरील निकाल बुधवारी पहाटे जाहीर करण्यात आला. परस्पर विरोधी पक्षांमध्ये हा सामना अटीतटीचा झाल्याने या मोजणीच्या सोळा फेऱ्या पार पडल्या. खुल्या प्रवर्गातील तीन जागांसह उर्वरित जागांचे निकाल मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत जाहीर करण्यात आले. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उर्वरित दोन जागांसाठी पहाटेपर्यंत मत मोजणीच्या फेऱ्या होत होत्या. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी बुधवारी पहाटे साडे चार वाजता संपली. ही मतमोजणी पूर्ण होण्यासाठी यावेळी तब्बल वीस तासांचा अवधी लागला.
......


PNE22T06920