मतदार नाव नोंदविण्यास आठ डिसेंबरपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार नाव नोंदविण्यास
आठ डिसेंबरपर्यंत मुदत
मतदार नाव नोंदविण्यास आठ डिसेंबरपर्यंत मुदत

मतदार नाव नोंदविण्यास आठ डिसेंबरपर्यंत मुदत

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : मतदार यादीत अद्याप नाव समाविष्ट नसलेल्या १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींना नाव नोंदविण्यासाठी येत्या आठ डिसेंबरपर्यंत नमुना अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाचा छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यानुसार आठ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येत आहेत. या कालावधीत १८ वर्षांवरील व्यक्तींना मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी समुदाय, देहव्यवसाय करणाऱ्या महिला आणि भटक्या व विमुक्त जमातींच्या व्यक्तींसाठी नियोजित ठिकाणी विशेष शिबिर होणार आहे. तसेच, तीन आणि चार डिसेंबर रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी नागरिकांनी शिबिरांमध्ये आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

असे नोंदवा नाव
संकेतस्थळ nvsp.in
मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाइन (Voter Helpline App) डाऊनलोड करून अर्ज क्रमांक सहा भरावा किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.