‘सी-मेट’मध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सी-मेट’मध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिषद
‘सी-मेट’मध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिषद

‘सी-मेट’मध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

पुणे,ता. ः येथील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) या संशोधन संस्थेत गुरुवार (ता.२४) पासून दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२२ हे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘काच’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्ताने २४ व २५ नोव्हेंबरला ही परिषद पार पडेल, अशी माहिती समन्वयक डॉ. तनय सेठ व डॉ. पराग अध्यापक यांनी दिली.

परिषदेमध्ये काचेवर संशोधन करणारे देश- विदेशातील शास्त्रज्ञ, उद्योजक व संशोधक सहभागी होणार आहेत. संशोधन क्षेत्रामध्ये सी-मेट ही एक अग्रणी संस्था असून, काच-पदार्थ या विषयावर आजपर्यंत अनेक संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती सी-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे यांनी दिली. सध्या डॉ. काळे हे काच-पदार्था पासून हैड्रोजन इंधन निर्मितीसाठी प्रयत्नशील असून, त्यांना यासाठी ब्रिटनच्या रॉयल केमिकल सोसायटीकडून संशोधन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिषदेचे उदघाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, डी.आर. डी. ओ.चे महासंचालक डॉ शैलेंद्र गाडे व सी. एस. आई. आर. चे महासंचालक डॉ एन. कलाईसेल्वीयांच्या उपस्थित होणार आहे.