तिसऱ्या उलूक उत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या उलूक उत्सवाचे
डिसेंबरमध्ये आयोजन
तिसऱ्या उलूक उत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन

तिसऱ्या उलूक उत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः देशातील तिसऱ्या उलुक उत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. इला फाउंडेशनच्या पुरंदर तालुक्यातील ‘इला हॅबिटॅट’ येथे एक व दोन डिसेंबर रोजी हा उत्सव पार पडेल, अशी माहिती डॉ. सतीश पांडे यांनी दिली.
उत्सवामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, शेतकरी व निसर्ग मित्रांसाठी विविध गोष्टी पाहण्याची व शिकण्याची संधी मिळणार असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘घुबड हा मानवासह शेतकऱ्याचा मित्र आहे. घुबडांबद्दल समाजात मोठया अंधश्रद्धा व चुकीचे समज आहेत. घुबडांच्या भारतात एकूण ४२ प्रजाती आढळत असून त्याची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने उलूक उत्सवाचे आयोजन केले आहे.’’ उत्सवामध्ये घुबडांची शास्त्रीय माहिती, सांस्कृतिक वारसा व महत्त्व समजण्यासाठी घुबडांच्या विविध कलाकृती, चित्रे, गायन, वादन, नाटिका, नृत्य, वक्तृत्व, पोवाडा, रांगोळी, मेंदी काम, फेस पेंटिंग व लेख अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.