कर निरीक्षकांची निवड यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर निरीक्षकांची निवड यादी जाहीर
कर निरीक्षकांची निवड यादी जाहीर

कर निरीक्षकांची निवड यादी जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी जाहीर झाली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ अंतर्गत ही निवड केली आहे.

परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर पेठांतील अभ्यासिकांत ढोल-ताशा वाजवून निवड झालेल्या उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला. एकूण ६०९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया झाली. आयोगाच्या संकेतस्थळावर सविस्तर गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, उमेदवारांना ऑप्टींग आउटचाही पर्याय खुला असणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना या प्रक्रियेतून बाहेर पडता येईल. ३०१ गुण संपादित करत पाडुळे अक्षय दिवाण याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील गणेश कैलास टाकसाळे याने २९८ गुण प्राप्त केले आहेत. मुलींमध्ये पहिली आणि राज्यात तिसरा येण्याचा मान नम्रता ज्ञानदेव म्हस्के हीने २९७.५० गुण मिळवत पटकावला आहे. उमेदवारांची ही तात्पुरती गुणवत्ता यादी असून, विविध दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीने काही उमेदवारांच्या शिफारशीत फरक होऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.