आसरा पिठाची गिरणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसरा पिठाची गिरणी
आसरा पिठाची गिरणी

आसरा पिठाची गिरणी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः पीएमपीच्या कात्रज आगारातील श्रीमंत सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशन’द्वारे संचलित ‘आसरा’ या संस्थेला पिठाची गिरणी भेट म्हणून नुकतीच देण्यात आली.

पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या हस्ते आसरा संस्थेच्या संचालिका स्वाती डिंबळे यांना पिठाची गिरणी सुपूर्द करण्यात आली. या वेळी पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका स्मिता कोंढरे, पीएमपीचे कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे, कात्रज आगार व्यवस्थापक गोविंद हांडे, रामराज्य बँकेचे संस्थापक विजय मोहिते, उद्योजक नितीन दळवी, श्रीमंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत गिरे आदी उपस्थित होते.