पुणे- गोवा सायकल स्पर्धा उद्यापासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे- गोवा सायकल स्पर्धा उद्यापासून
पुणे- गोवा सायकल स्पर्धा उद्यापासून

पुणे- गोवा सायकल स्पर्धा उद्यापासून

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः द डेक्कन क्लिफहॅंगची नववी आवृत्ती असलेली देशातील प्रसिद्ध पुणे- गोवा अल्ट्रा सायकलींग इव्हेंटला शनिवारी (ता. २६) पहाटे चार वाजता प्रारंभ होणार आहे. कर्वेनगरमधील डी. पी. रस्त्यावरील केशवबाग येथून ही स्पर्धा सुरू होईल. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२७) गोव्यातील बोगमालो बीचवरील जॉन्स सीगल येथे स्पर्धेचा समारोप होईल.

ही स्पर्धा ६४३ किलोमीटरची असून ती दख्खनच्या पठारापासून कोकणात जाते. स्पर्धेचा मार्ग महाबळेश्वरच्या उंच पर्वतरांगा, आंबोली घाटाच्या घनदाट जंगलातून उतरून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर संपतो. या स्पर्धेत विविध हवामान बदलांचे आव्हान आहे. ‘रेस अक्रॉस अमेरिका’ स्पर्धेला सोलो क्वालिफायर होण्यासाठी सायकलपटूंनी ६४३ किलोमीटर अंतर नॉन-स्टॉप (१८-४९ वर्षे वयोगटातील) ३२ तासांत पूर्ण करणे आवश्यक आहे. सहभागी सायकलपटूंचे सहकारी त्यांच्या साथीला वाहनात असतील.

पुणे येथे रेसर्स आणि त्यांच्या क्रू सदस्यांसह जवळपास ३५० लोक स्पर्धेत सहभागी होतील. कोलकाता, वाराणसी, वडोदरा, हैदराबाद, छत्तीसगड, मेहसाणा, कोईम्बतूर, दार्जिलिंग, बंगळुरू, गुवाहाटी चेन्नईसह राज्यभरातून रेसर्स स्पर्धेत सहभागी होत आहेत. पुण्यातील इन्स्पायर इंडिया या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीने संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले आहे. शर्यतीची अधिक माहिती https://www.inspireindia.net.in/deccan-cliffhanger या संकेतस्थळावर मिळू शकेल.