Prevent Accidents : चालकांसाठी प्रशिक्षण संस्था कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prevent Accidents Training institute for drivers
चालकांसाठी प्रशिक्षण संस्था कागदावरच

Prevent Accidents : चालकांसाठी प्रशिक्षण संस्था कागदावरच

पुणे : अवजड वाहनांचे होणारे अपघात रोखण्यासाठी त्या चालकांना प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २०१९ मध्ये देशात एक हजार प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या तीन वर्षांत राज्यात एकही प्रशिक्षण संस्था तयार झालेली नाही. अतसेच मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून चालकांसाठी शिक्षणाची असलेली अट देखील दूर केली आहे. त्यामुळे अशिक्षित चालकांची भरच पडत आहे.

उद्योग विश्वातील ‘वाहतूक’ हा घटक सर्वांत महत्त्वाचा; मात्र त्यासाठीचे चालक हे अप्रशिक्षित आहेत. अनेक अवजड वाहनांवर तर चालकांच्या शेजारी बसणारे क्लिनरच काही दिवसानंतर चालक बनलेले आहे. रस्ते वाहतूक विषयीचे कोणतेही नियम माहीत नसलेले तसेच प्रशिक्षित नसलेले चालकाची संख्या खूप मोठी असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहेत. रस्ते अपघाताला अनेक कारणे कारणीभूत असले तरीही अप्रशिक्षित चालक हे देखील सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

सहा महिन्यांत १८ हजार अपघात
महाराष्ट्रात जानेवारी ते जून २०२२ पर्यंत सुमारे १८ हजार रस्ते अपघातात झाले आहे. यात ८१०० हुन अधिक व्यक्तीचा मृत्यू झाला. यासाठी कारणे वेगळी असतील; मात्र अकुशल चालक नसणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

हे करणे गरजेचे
- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २०१९ मध्ये एक हजार प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला
- अद्याप एकही प्रशिक्षण संस्था सुरू झालेली नाही. त्या सुरू करणे गरजेचे
- अपघात कमी करण्यासाठी चालकांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे
- शिवाय अवजड वाहन चालकाचे वाहन परवानाचे नूतनीकरण दर तीन वर्षांनी केले जाते
- जेव्हा चालक वाहन परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात येतात त्यावेळी चालकांना संस्थात्मक प्रशिक्षण दिल्याशिवाय परवाना दिला जाऊ नये

राज्यातील रस्ते अपघात
वर्ष अपघात मृत्यू जखमी
२०२० २४,९७१ ११,५६९ १९,९१४
२०२१ २४, ४९३ १३, ५२८ २३०६९
२०२२ (जानेवारी ते जून ) १८,००० ८०६८

पुणे परिक्षेत्रातील रस्ते अपघात
वर्ष अपघात मृत्यू जखमी
२०२० १४०८ ७९९ ९३४
२०२१ २१४८ ११६१ १५२९
२०२२ (ऑकटोबरअखेर) १५६९ ८४८ १३०४