सरपोतदार बंधूंचा एनजीओ फेडरेशनतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरपोतदार बंधूंचा एनजीओ फेडरेशनतर्फे सत्कार
सरपोतदार बंधूंचा एनजीओ फेडरेशनतर्फे सत्कार

सरपोतदार बंधूंचा एनजीओ फेडरेशनतर्फे सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : सामाजिक कार्यातील सहभाग आणि कोरोनाच्या काळात जागरूकता करणाऱ्या विवेक व योगेश सरपोतदार या बंधूंचा त्यांचे वडील विकास सरपोतदार यांच्यासह पुणे एनजीओ फेडरेशनतर्फे नुकताच सत्कार केला.
शहरातील विविध क्षेत्रांत सामाजिक काम करणाऱ्या ५० संघटना व समाजसेवकांचा सत्कार समारंभ नुकताच झाला. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका कोंढव्यातील माजी नगरसेविका हसीना इनामदार व सामाजिक कार्यकर्ते हाजी फिरोज शेख तसेच पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जुबेर रशीद खान यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार केला.