तीन सदस्यांचा एक प्रभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन सदस्यांचा एक प्रभाग
तीन सदस्यांचा एक प्रभाग

तीन सदस्यांचा एक प्रभाग

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : आगामी महापालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भाने निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग असेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाकडून नव्याने प्रभाग रचना तयार करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली. निवडणूक आयोगाने व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार याद्यांच्या विषयावर चर्चा झाली. मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आहेत. त्या दुरुस्त करण्याबरोबरच अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नव्याने प्रभागरचनेबाबतचे आदेश जरी प्रशासनाला प्राप्त झाले असले, तरी प्रभाग रचनेचा कार्यक्रम अद्याप आयोगाकडून न आल्याने प्रशासन देखील संभ्रम अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. ही रचना करताना २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे.