सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पारितोषिक वितरण
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पारितोषिक वितरण

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पारितोषिक वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः सह्याद्री सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी गणपती सजावट स्पर्धेत प्रियांका खुटवड प्रथम, यश पाटील द्वितीय आणि रुक्मिणी सकट यांना तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यात आला. तर गौरी सजावट स्पर्धेत मदन दातीर, सुमन साखरे आणि किरण मारणे यांना पुरस्कार प्राप्त झाला. त्याचबरोबर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या मेमरी स्पर्धेमध्ये विक्रम नोंदवल्याबद्दल राधिका जगताप हिचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजय पानगावे, नगरसेविका स्मिता वस्ते, विनोद वस्ते उपस्थित होते.