संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम
संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), सम्यक ट्रस्ट आणि संविधान सन्मान समिती यांच्यावतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला पाच हजार दीप प्रज्ज्वलित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव आणि शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, संपर्क प्रमुख अशोक कांबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र सचिव मोहन जगताप आदी उपस्थित होते.

‘गेल्या आठ वर्षांपासून या तिन्ही संस्थांच्यावतीने संविधान दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीही संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी ६.३० वाजता पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात पाच हजार दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात येणार आहे.’ असे सचिव बाळासाहेब जानराव यांनी सांगितले.

त्यानंतर चव्हाण म्हणाले, ‘‘संविधान दिनानिमित्त बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही बाईक रॅली निघेल. रॅली पोचल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन होईल. दुपारी साडेबारा वाजता ‘रिपाइं’चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांचे ‘संविधानाने दिलेले अधिकार व आमची कर्तव्ये’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.’’
--------------