‘डिजिटल डेंटिस्ट्री’ला सर्वतोपरी सहकार्य करू ः चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डिजिटल डेंटिस्ट्री’ला सर्वतोपरी सहकार्य करू ः चंद्रकांत पाटील
‘डिजिटल डेंटिस्ट्री’ला सर्वतोपरी सहकार्य करू ः चंद्रकांत पाटील

‘डिजिटल डेंटिस्ट्री’ला सर्वतोपरी सहकार्य करू ः चंद्रकांत पाटील

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : ‘‘डिजिटल डेंटिस्ट्री झपाट्याने विकसित होत असलेली अत्याधुनिक वैद्यकीय शाखा आहे. ती अधिक लोकाभिमुख व्हावी व या क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार व्हावेत, यासाठी डिजिटल डेंटिस्ट्रीचा अभ्यासक्रम सुरू करावा. राज्य सरकार त्यासाठी लागणारी जागा व अन्य पायाभूत सुविधा आणि परवानग्या असे सर्वतोपरी सहकार्य करेल,’’ असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.

‘इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री’तर्फे आयोजित ‘प्रगत दंतोपचार व दंतरोपण’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटनावेळी पाटील बोलत होते. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’चे महासंचालक प्रशांत गिरबने, इंडियन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पंकज चिवटे, सचिव डॉ. रत्नदीप जाधव, खजिनदार डॉ. विजय ताम्हाणे, सहसचिव डॉ. केतकी असनानी, सहखजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. संजय असनानी, डॉ. सुरेश लुधवानी आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘दंत चिकित्सेत अत्याधुनिक उपचार लोकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्यासाठी ‘इनोव्हेशन’ हवे. यासाठी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीने पुढाकार घ्यावा.’’ गिरबने म्हणाले, ‘‘डिजिटल हेल्थ हा डिजिटल इंडियाचा एक महत्त्वाचा घटक आहे. कोविन, ई-संजीवनी, टेलिमेडिसीन, मेडिकल डिव्हायसेस यामुळे आरोग्य सुविधा अधिक जलद, सोप्या व सहज होत असल्याचे पाहिले. भारतात स्टार्टअप संस्कृती लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करीत आहे. त्यातून करोडो लोकांना लाभ होत आहे.’’ डॉ. रत्नदीप जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुचेता वंजारी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी आभार मानले.