‘संविधान सन्मान दौड’साठी चार हजार नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संविधान सन्मान दौड’साठी चार हजार नोंदणी
‘संविधान सन्मान दौड’साठी चार हजार नोंदणी

‘संविधान सन्मान दौड’साठी चार हजार नोंदणी

sakal_logo
By

पुणे, ता ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी (ता. २६) होणाऱ्या संविधान सन्मान दौडसाठी चार हजाराहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. संविधान दिनानिमित्त विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने हे संविधानाबाबत जनजागृतीसाठी या दौडचे आयोजन केले आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभापासून या दौडची सुरुवात होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवत सकाळी ५.३० वाजता दौड सुरू होईल, अशी माहिती डॉ. विजय खरे यांनी दिली.