पायोनियर कोअरचा स्थापना दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पायोनियर कोअरचा स्थापना दिन उत्साहात
पायोनियर कोअरचा स्थापना दिन उत्साहात

पायोनियर कोअरचा स्थापना दिन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः भारतीय सैन्यदलाच्या पायोनिअर कोअरचा ८१ वा स्थापना दिन उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह यांनी निवृत्त अधिकारी, माजी सैनिक, वीर नारी यांचा सन्मान केला. तसेच राष्ट्र उभारणीसाठी कोअरच्या अधिकारी जवानांच्या योगदानाचे कौतुक केले. पायोनिअर कोअरची स्थापना १७५८ मध्ये चेन्नई येथे झाली होती. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या सर्व मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्याचबरोबर विविध मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कोअरच्या जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल पायोनिअर कोअरला आतापर्यंत एकूण २०५ शौर्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच नोव्हेंबर २००४ मध्ये लष्कर प्रमुखांद्वारे या कोअरला ‘प्रेसिडेंट कलर्स’ने गौरविण्यात आले आहे.