पुणेकरांना पाहता येणार दुर्मिळ चलनांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांना पाहता येणार
दुर्मिळ चलनांचे प्रदर्शन
पुणेकरांना पाहता येणार दुर्मिळ चलनांचे प्रदर्शन

पुणेकरांना पाहता येणार दुर्मिळ चलनांचे प्रदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः महाराष्ट्र नाणकशास्त्र परिषदेच्या वतीने दुर्मिळ चलनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात नागरिकांना पुरातन काळातील नाणी, नोटा आणि इतर वस्तू तसेच देवी-देवतांच्या मूर्त्या पाहाण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर जगभरातील चलने, पोस्टल स्टॅम्प आदी गोष्टींचा संग्रहप्रदर्शनात सादर केला जाणार आहे. हे प्रदर्शन शनिवार (ता. २६) ते रविवार (ता. २७) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत चतुःश्रृंगी मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या सांस्कृतिक हॉलमध्ये सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. तर जास्ती जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह देवत्त अनगळ यांनी केले आहे.