वीजबिल भरणा आज-उद्या सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजबिल भरणा आज-उद्या सुरू
वीजबिल भरणा आज-उद्या सुरू

वीजबिल भरणा आज-उद्या सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : वीज ग्राहकांना चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे, यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवार (ता. २६) व रविवार (ता. २७) या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात महावितरणची थकबाकी वाढलेली असून थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. थकबाकीदार ग्राहकांचा थकबाकीपोटी वीज खंडित करण्यात येत आहे. चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे म्हणून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे चालू ठेवण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. थकबाकीदार सर्व वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे.