
प्राचार्य गटासाठी ९५ टक्के मतदान मंगळवारी मतमोजणी; नऊ उमेदवारांमध्ये लढत
पुणे, ता. २८ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य गटासाठी रविवारी (ता.२७) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ९५ टक्के प्राचार्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, मंगळवारी (ता.२९) मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
मागील आठवड्यातच अधिसभेतील पदवीधर गटासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यासह सिल्वासा येथील केंद्रात पार पडलेली पदवीधरची निवडणूक सर्वार्थाने गाजली. दहा जागांपैकी नऊ जागांवर विद्यार्थी विकास मंच तर एका जागेवर सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलने विजय मिळविला होता. आता प्राचार्य गटासाठी मतदान झाले असून, पुढील काही दिवसांतच प्राध्यापक गटासाठीही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्राचार्य गटातील नऊ उमेदवारांचे भविष्य आता मतपेटीत बंदीस्त झाले असून, मंगळवारी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात ही मतमोजणी पार पडेल.
प्राचार्य गटासाठीच मतदान
पुणे ः १८० ः १७२ ः ९५.५
नगर ः ४३ ः ३९ ः ९०.६
नाशिक ः ७५ ः ७३ ः ९७.३
एकूण ः २९८ ः २८४ ः ९५.३