
अरुणकुमार अचलकर यांचे निधन
पुणे ः सहकारनगरमधील रहिवासी अरुणकुमार मुकुंदराव अचलकर (वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी हेमा, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. वास्तुविशारद विकास अचलकर यांचे ते वडील होत. अरुणकुमार अचलकर यांचे शालेय शिक्षण हे धारवाड, हुबळी येथे झाले होते. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून नाशिक विभागाचे मुख्य अभियंते म्हणून ते निवृत्त झाले होते.
अश्विन अंतरकर
पुणे ः पौड रस्त्यावरील रहिवासी अश्विन अशोक अंतरकर (वय ५१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. अश्विन हे सकाळच्या जाहिरात विभागात काही काळ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
पुणे ः शनिवार पेठेतील रहिवासी रत्नप्रभा प्रभाकर साप्ते (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सन्मित्र संघाचे दिवंगत कबड्डीपट्टू प्रभाकर साप्ते यांच्या त्या पत्नी होत.