पारसनीस चरित्र व कार्य ग्रंथाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारसनीस चरित्र व कार्य ग्रंथाचे प्रकाशन
पारसनीस चरित्र व कार्य ग्रंथाचे प्रकाशन

पारसनीस चरित्र व कार्य ग्रंथाचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः थोर इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य, या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
या ग्रंथाचे लेखक रावबहादूर पारसनीस यांचे नातू डॉ. सुरेंद्र श्रीकृष्ण पारसनीस, त्यांनी या ग्रंथ लेखनाबद्दल त्यांची भूमिका विशद केली. ‘आजच्या तरुण वर्गाला हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल’ असे त्यांनी सांगितले. बलकवडे यांनी ‘रावबहादूर पारसनीस यांनी ब्रिटिशांच्या अमदानीत मोठ्या कौशल्याने संस्थानिकांकडून ऐतिहासिक कागदपत्रे, साधने मिळविली आणि ती इतिहास अभ्यासकांना उपलब्ध करून दिली हे त्यांचे कार्य गौरवास्पद आहे,’ असे प्रतिपादन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या संधिकालात ऐतिहासिक साधनांना उजेडात आणून, त्यांचं संस्थात्मक पद्धतीनं जतन करून शिवाय स्वतंत्र दृष्टीने साधार इतिहासलेखन करणारे दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे एक जागतिक दर्जाचे इतिहासकार होते, असे सांगितले. सुनीता पारसनीस यांनी सूत्रसंचालन केले. डॉ अमित पारसनीस यांनी आभार मानले.