महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित 
गट-ब मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल

sakal_logo
By

स्वारगेट, ता. २८ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा अनुक्रमे पाहिला पेपर २४ डिसेंबर व दुसरा पेपर ३० डिसेंबर रोजी होणार होता. मात्र, आयोगाने ही परीक्षा काही प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली आहे. अनुक्रमे ७ जानेवारी व १४ जानेवारी रोजी हे पेपर होणार असल्याचे आयोगाने सोमवारी जाहीर केले. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब या परीक्षेची पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला दोन लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक, मंत्रालय सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक या ८२३ एकूण पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आणखी पंधरा दिवस अभ्यासासाठी वेळ मिळाला असल्याची विद्यार्थ्यांमध्ये भावना आहेत, असे सुजित पोकळे या विद्यार्थ्याने सांगितले.