पश्चिम भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद
पश्चिम भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

पश्चिम भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः शहराच्या पश्चिम भागात पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने या ठिकाणी पाणी बंद करावे लागत आहे. जलकेंद्रावरील विद्युत आणि स्थापत्य विषयक कामामुळे कोथरूड, बावधन, वारजे, कर्वेनगर औंध, बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगर, सेनापती बापट रस्ता परिसरातील पाणी गुरुवारी (ता. १) पाणी बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. २) उशिरा व कमी दाबाने पाणी येईल असे पाणी पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, वारजे टाकीवरील विद्युत पुरवठ्यातील बिघाडामुळे गेल्या महिन्यात अचानक भागातील पाणी बंद ठेवण्यात आले होते.
वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपिंग, कोंढवे-धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत व स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढील प्रमाणे
चांदणी चौकातील चौकोनी टाकी ः पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रस्ता.

गांधी भवन टाकी : कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य महाविद्यालय, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतिवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९, मुंबई पुणे बाह्यवळण मार्ग दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता, कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी,शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०

पॅनकार्ड क्लब टाकी : बाणेर, बालेवाडी, बाणेर, गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्त नगर

एसएनडीटी एचएलआर : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी,
गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाइन, संगमवाडी.

कोंढवे-धावडे जलकेंद्र : वारजे महामार्ग परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे,कोंढवे धावडे,न्यू कोपरे.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग : मुळा रस्ता, खडकी कँन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, एमईएस, हरीगंगा सोसायटी इत्यादी.