Sat, Jan 28, 2023

पैसे भरूनही वीजपुरवठा खंडित
पैसे भरूनही वीजपुरवठा खंडित
Published on : 28 November 2022, 2:49 am
पुणे, ता. २८ : पैसे भरूनही वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या स्वारगेट येथील कार्यालयातील अधिकाऱ्यावर हाईट लाइट फोरमच्यावतीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. फोरमचे उमेश नाईक यांनी ही तक्रार दाखल केली आहे. वीजबिलाचा भरणा केला असतानाही महावितरणकडून त्यांच्या गुरुवारी पेठ येथील घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.