
काँग्रेसतर्फे महात्मा फुलेंना अभिवादन
पुणे, ता. २८ : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन व समता भूमी येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना माजी नगरसेविका नीता रजपूत म्हणाल्या, ‘‘समतेचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाला घरातूनच सुरवात केली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवल्यामुळे महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी झाली आणि आज सर्व क्षेत्रात महिला समर्थपणे काम करीत आहेत. शिक्षणामुळे आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, अजित दरेकर, सचिन आडेकर आदी उपस्थित होते.
---
महात्मा फुले स्मारक ट्रस्टतर्फे अभिवादन
मीठगंज पोलिस चौकाजवळील महात्मा फुले यांच्या पहिल्या नागरी अर्ध पुतळ्यास आझम कॅम्पसचे संस्थापक पी.ए.इनामदार यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी ट्रस्टचे सचिव डॉ. गणेश परदेशी, अब्दुल वहाब शेख आदी उपस्थित होते.
------------------------
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशनच अभिवादन मिरवणूक
आझम कॅम्पसच्या वतीने आठ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आझम कॅम्पस ते महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक (गंज पेठ) या मार्गावर अभिवादन मिरवणूक काढली. मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. महात्मा फुलें, सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसले होते. दरबार ब्रास बँड, बग्गी, बैलगाडी, महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी, पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक सहभागी झाले. इरफान शेख, शाहीद इनामदार, वाहिद बियाबानी, असिफ शेख, अब्दुल वहाब शेख आदी उपस्थित होते. फुले वाड्यात या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना वंदन केले.