
महाराष्ट्र सत्तासंर्घर्षाची सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली, २८ : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढे सुरु आहे. या पाच न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश उद्या उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी कधी होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.
घटनापीठातील न्या. कृष्ण मुरारी हे उपलब्ध नसल्याने उद्या सुनावणी होऊ शकणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोटिसाद्वारे स्पष्ट केले आहे. घटनापीठामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.
मागील सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत दिली होती. उद्या होणारी सुनावणी शिंदे-फडणवीस सरकारच्यादृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता होती.