Mon, Feb 6, 2023

दृष्टिहीन मुलांच्या सहलीचे आयोजन
दृष्टिहीन मुलांच्या सहलीचे आयोजन
Published on : 1 December 2022, 8:53 am
पुणे, ता. १ ः भोसरी येथील पताशिबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट संचलित अंध शाळेतील ४० विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. गिफ्टएबल्ड फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित या सहलीत लोणावळा जवळील भाजे या ऐतिहासिक लेण्यांना सहल आयोजित केली होती. या सहलीची सुरुवात संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करून व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आले होते. सर्व विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील आहेत. या शाळेत निवासी राहत असून शालेय शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना गिफ्टएबल्ड संस्थेकडून बस सेवा आणि जेवणाची व्यवस्था डॉन बॉस्को या संस्थाकडून मोफत करण्यात आली होती.