उद्योग-व्यवसायासाठी डेटा महत्त्वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योग-व्यवसायासाठी डेटा महत्त्वाचा
उद्योग-व्यवसायासाठी डेटा महत्त्वाचा

उद्योग-व्यवसायासाठी डेटा महत्त्वाचा

sakal_logo
By

पुणे, ता. १ : बदलेल्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात अद्ययावतपणा आला आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध होत असल्याने विकासाला गती मिळाली आहे. या सर्वांत बांधकाम क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर उद्योग-व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी डेटा महत्त्वाचा ठरत आहे, असे मत लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग, डेटा सेंटर्स आणि लवचिक कार्यक्षेत्र क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’च्यावतीने (सीआयआय) पश्चिम क्षेत्रासाठी ‘इंडियन रिअल इस्टेट 2.0-स्केलिंग न्यू हाइट्स’ ही एक दिवसीय परिषद बुधवारी (ता. ३०) आयोजित करण्यात आली होती. त्यातील ‘द न्यू हिरोज् ऑफ रिअल इस्टेट : लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग, डेटा सेंटर्स आणि फ्लेक्सिबल वर्कप्लेस’ या विषयावरील चर्चासत्रात ‘कोहिनूर ग्रुप’च्या व्यावसायिक विभागाचे संचालक प्रसांथ गोपीनाथ, ‘एनटीटी इंडिया प्लस ग्लोबल डेटा सेंटर्स इंडिया’चे वरिष्ठ दिग्दर्शक संदीप दांडेकर, ‘डेटा सेंटर कॅपिटलँड’चे गुंतवणूक आणि व्यावसायिक प्रमुख रमैय कपूर, ‘गोयल गंगा कॉर्पोरेशन’च्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष निखिल अग्रवाल आणि ‘ग्रीनबेस इंडस्ट्रिअल पार्क्स’चे (हिरानंदानी) मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत प्रभू यांनी सहभाग घेतला होता. ‘सीबीआरर्इ इंडिया’च्या सल्लागार आणि व्यवहार विभागाचे वरिष्ठ संचालक दिव्या गुलेरिया यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. कामाच्या ठिकाणी होत असलेले बदल, डेटा संकलित करण्यासाठी उदयास येत असलेले नवीन आणि अधिक सोईस्कर मार्ग, बांधकाम खर्चात बचत करणारे तंत्रज्ञान आदी विषयांवर या चर्चासत्रात तज्ज्ञांनी आपले मत मांडले.

कोण काय म्हणाले?
- प्रसांथ गोपीनाथ ः ‘‘कोरोनानंतर ग्राहकांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. आता घरातच त्यांना ऑफिसची जागा देखील हवी आहे. तसेच आता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाण्याची गरज राहिलेली नाही हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे.’’
- संदीप दांडेकर ः ‘‘डेटा क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली असून त्यासाठी कामगार देखील आहेत. व्यवसाय वाढीसाठी क्लाउडचा वापर केला जात आहे. त्यामुळे टेडा सेंटरची संख्या वाढत आहे’’.
- रमैय कपूर ः ‘‘विविध क्षेत्रांतील तंत्रज्ञान बदलत आहेत. त्यासाठी असलेल्या पायभूत सुविधा देखील उपलब्ध होत आहेत’’.
- निखिल अग्रवाल ः ‘‘येत्या काळात हायब्रीड कामाची पद्धत कायम राहील असे वाटते. कारण ही पद्धत आता अनेकांना आवडू लागली आहे.’’
- हेमंत प्रभू ः ‘‘बांधकाम क्षेत्र सर्वांवर सकारात्मक परिणाम करणारे क्षेत्र आहे. ग्राहकांना आता त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून जवळ घर हवं आहे. सर्व एकाच जागी असलेल्या घरांना असलेली पसंती कायम आहे. टीअर टू शहरात बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.’’