अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर संधींबाबत विनामूल्य वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर
संधींबाबत विनामूल्य वेबिनार
अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर संधींबाबत विनामूल्य वेबिनार

अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर संधींबाबत विनामूल्य वेबिनार

sakal_logo
By

पुणे, ता. १ : अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर संधी व उपलब्ध अभ्यासक्रम याविषयी माहिती देणारा विनामूल्य वेबिनार रविवारी (ता. ४) सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे. बीकॉम, बीबीए, बीए, बीएससी अशा विविध प्रवाहांतील विद्यार्थ्यांसाठी अकाउंटिंग क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अकाउंटिंग क्षेत्रातील वाढत्या मागणीला योग्य कौशल्यांसह सामोरे जाण्याचे मार्ग कोणते? याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महाविद्यालयीन जीवनातच रोजगारक्षम प्रशिक्षण घेऊन ‘जॉब रेडी’ होण्याचे मार्ग सांगितले जातील. या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रतीक धुलकर हे यामध्ये मार्गदर्शन करतील.
संपर्क : ७३५०००१६०२
क्यूआर कोड : ०८४६८ नंबर

सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

बोन्साय वृक्ष कलाकृतीविषयी कार्यशाळा

पुणे, ता. १ : बोन्साय (मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती) हे एकता, सुखशांती, विवेक, निसर्गाचा समतोल व कलेचे प्रतीक मानले जाते. असे विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष कसे तयार करतात, त्यासाठीचे तंत्रज्ञान याविषयी लेखी तसेच प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवार १० डिसेंबर रोजी सकाळ व ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीच्या वतीने सकाळनगर येथे आयोजित केली आहे.
यात बोन्सायचे विविध प्रकार, त्यासाठी रोपांची निवड, बोन्सायकरिता योग्य झाडांची निवड, वृक्षांचे वर्गीकरण, बोन्साय करण्यासाठी तारेचा उपयोग, लागणारी हत्यारे व साधने, खतांची आवश्यकता, बोन्साय पॉट किंवा तबकाची निवड, बोन्साय तंत्र इ. विषयी बोन्साय विषयातील नामवंत विशेषज्ज्ञ डॉ. एस. डी. जटुरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार रुपये.
अधिक माहिती व आगाऊ नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१
कार्यशाळेचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट नं.१, बाणेर रोड, औंध, पुणे