वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी उपसंचालकांचे ‘इंजेक्शन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी 
उपसंचालकांचे ‘इंजेक्शन’
वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी उपसंचालकांचे ‘इंजेक्शन’

वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी उपसंचालकांचे ‘इंजेक्शन’

sakal_logo
By

पुणे, ता. १ : बायोमेट्रिक हजेरी नाही, गोवरच्या लसीकरणाचा घसरलेला टक्का, प्रसूतीचे कमी झालेले प्रमाण आणि स्वच्छतेचा उडालेला बोजवारा अशी अवस्था शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयाची असल्याचे निरीक्षण खुद्द आरोग्य खात्याच्या उपसंचालकांनी नोंदविले. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी उपसंचालकांनी ‘इंजेक्शन’ दिले.
बायोमेट्रिक हजेरी लावल्याशिवाय नोव्हेंबरचे वेतन निघणार नाही, अशा सूचना आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाला दिल्या. रुग्णालयीन प्रसूतीचे प्रमाण कमी असून, सिझेरियनही या रुग्णालयात होत नसल्याचे निरीक्षणही त्यांनी टिपले.
डॉ. पवार यांनी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी ही निरीक्षण टिपली आहेत. आरोग्य खात्याच्या सर्व संस्थांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्षात या पाहणीत शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरी सुरू झाली नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून वैद्यकीय अधिक्षक आणि कार्यालयीन अधिक्षक यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसले आहे. त्यामुळे बाटोमेट्रिक हजेरी तातडीने लावण्यात यावी. त्याशिवाय नोव्हेंबरचे वेतन निघणार नाही, याची नोंद घेण्याच्या सूचना डॉ. पवार यांनी दिल्या आहेत.