
ससून हॉस्पिटलला ५० लाखांची उपकरणे
पुणे : ‘रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्ट''तर्फे ससून रुग्णालयाच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागाला ५० लाख रुपयांची अद्ययावत वैद्यकीय उपकरणे देण्यात आली. ‘सेव्ह द बेबीज’ उपक्रमांतर्गत ‘ग्लोबल ग्रॅन्ट’द्वारे पुढाकार घेऊन रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्ट रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट, रोटरी क्लब ऑफ पूना डाऊन टाऊन, रोटरी क्लब ऑफ मियामी एअरपोर्ट, रोटरी क्लब ऑफ समरव्हिल यांच्या मदतीने ही वैद्यकीय उपकरणे देण्यात आली. या देणगीदारांमध्ये अल्काईल अलाइन्स केमिकल्स प्रा.लि. श्रीमती कुंज छुगानी, दादा फायरवर्क्स, लाइफ इन्स्पिरेशन एडव्हायझरी, ललिता भोसले एन्डोन्मेन्ट फंड, दिनेश श्रॉफ, समीर थवानी, मीरा भवनानी आदींचा समावेश आहे. अद्ययावत शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. दशमीत सिंग, अल्काईल अलाइन्स केमिकल्सचे उपाध्यक्ष अय्यर यांच्या हस्ते झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टचे पदाधिकारी उपस्थित होते.