व्यावसायिकाला लुटणारी टोळी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकाला लुटणारी टोळी गजाआड
व्यावसायिकाला लुटणारी टोळी गजाआड

व्यावसायिकाला लुटणारी टोळी गजाआड

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः आर्थिक घोटाळा केल्याचे सांगून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत गुंडाने व्यावसायिकाकडून तब्बल सहा लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्य संशयित आरोपी असिफखान ईस्माईलखान पठाण (रा. कोणार्क पूरम, कोंढवा, मूळ-औरंगाबाद), समीर मेहबूब शेख (वय ३६ ), शहाबाज मेहमूद खान (वय ५० ), फरियाज हसनखान पठाण ( वय ३९, तिघेही रा. संतोष नगर, कात्रज), इरफान हसन भोला (वय २५, रा. पर्वती पायथा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिासांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी असिफखान पठाण हा त्यांच्या ओळखीचा होता. त्याने फिर्यादीस त्यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला असल्याची भिती दाखविली. तुम्ही लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे तुमच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करतो, अशी भीती दाखवून त्यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीस बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून सहा लाख रुपयांची खंडणी उकळली. चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर पठाण हा त्याच्या साथीदारांसह पसार झाला. दरम्यान, चंदननगर पोलिसांनी बीड, जालना, औरंगाबाद या शहरांमध्ये त्यांचा तपास केला, मात्र ते पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान, मुख्य आरोपी औरंगाबाद येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली.