रेल्वे व पोस्टाची कार्गो सेवा जानेवारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे व पोस्टाची कार्गो सेवा जानेवारीत
रेल्वे व पोस्टाची कार्गो सेवा जानेवारीत

रेल्वे व पोस्टाची कार्गो सेवा जानेवारीत

sakal_logo
By

पुणे, ता. १ : जर तुम्हाला रेल्वेद्वारे पार्सल पाठवायचे असेल तर त्यासाठी आता स्थानकावर जाण्याची गरज नाही. कारण तुमच्या घरी येऊन ती वस्तू घेतली जाईल आणि इच्छित स्थळी देखील पोचवली जाईल. रेल्वे प्रशासन व पोस्ट प्रशासन दोघे एकत्रित येऊन ग्राहकांना ही सेवा देणार आहेत. दोन शहरांत रेल्वेद्वारे पार्सलची वाहतूक होईल तर शहरा अंतर्गातील वाहतूक पोस्टाद्वारे केली जाणार आहे. गतीशक्ती एक्स्प्रेस कार्गो सेवा असे याचे नावं असून जानेवारी २०२३ पासून पुणे शहरांत ही सेवा सुरु होणार आहे.

रेल्वे बोर्डाने पार्सल सेवेचे विस्तार करण्याचे ठरविले आहे. यासाठी काही दिवसापूर्वीच रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक हे पुणे स्थानकाच्या दौऱ्यावर आले होते. देशांत सुमारे ७५०० रेल्वे स्थानक आहेत. तर दीड लाख पोस्ट ऑफिस आहेत. एवढ्या मोठ्या व्यापक स्तरांवर पोचलेल्या यंत्रणेचा फायदा आता ग्राहकांना मिळणार आहे. तो देखील अगदी माफक दरात. कारण वस्तू घेऊन जाण्यासाठी अथवा घरी पोचविण्यासाठी प्रति किलो तीन रुपये असा पोस्टाचा दर असणार आहे. तर रेल्वेचा दर देखील किफायतशीर असणार आहे. त्यामुळे फळ भाजीपाल्यापासून ते वाहन पाठविण्यापर्यंत सर्वच वस्तू ग्राहकांना आपल्या घरातून पाठविणे शक्य होणार आहे.
----------------
काय आहेत वैशिष्ठे :
१. गती शक्ती एक्स्प्रेस कार्गो सेवेचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे यात ग्राहकांना घरी बसूनच पार्सलच्या सेवेचा लाभ मिळेल.
२. स्थानकावर जाण्याची गरज नसल्याने वेळेत बचत होईल.
३. वाहतूक करताना वस्तूची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यासाठी विशिष्ट अशा मोठ्या बॉक्सची निर्मिती.
४. ही एन्ड टू एन्ड सेवा आहे. पूर्वी रेल्वेचे पार्सल सेवा केवळ दोन स्थानका पुरतेच होती.
५. स्थानकाजवळच ऍग्रीकेशन केंद्रे बनवली जाईल. त्यामुळे पार्सल ऑफिसवर भार येणार नाही.
६. या सुविधेसाठी रेल्वे व पोस्टाची स्वतंत्र यंत्रणा काम करेल.
७. आवश्यकता भासल्यास संपूर्ण पार्सल रेल्वे चालवेल. त्याच्या डब्यांची रचना देखील वेगळी असेल.
८. पोस्टामध्ये येऊन पार्सलची वस्तू बुक केले तरी चालेल.
९. लवकरच ही अँप बेस सेवा होईल.
-------------
पार्सल सेवा :

पुणे स्थानकावरून रोज सरासरी २०० टन मालाची वाहतूक पार्सलद्वारे होते.
रोज सुमारे चाळीस दुचाकी येतात आणि जातात.
ऑनलाइन सेवा असल्याने ग्राहकांना पाठविलेल्या वस्तूची माहिती मेसेज द्वारे तत्काळ समजते.


रेल्वे प्रशासन व पोस्ट प्रशासन एकत्रित येऊन ही सेवा देत आहोत. या संदर्भात पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली असून आवश्यक त्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. लवकरच ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येईल.
-डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे.