कर्करोगावर मोफत उपचार करून वाढवले मनोधैर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगावर मोफत उपचार करून वाढवले मनोधैर्य
कर्करोगावर मोफत उपचार करून वाढवले मनोधैर्य

कर्करोगावर मोफत उपचार करून वाढवले मनोधैर्य

sakal_logo
By

कर्करोगाशी लढण्याचं बळ देणारं विश्रांती हॉस्पिटल
कर्करोगावर मोफत उपचार करून वाढवले मनोधैर्य

पुणे,ता.१२: १९९० साली आईला कर्करोग (कॅन्सर) वर योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. उपचार न मिळाल्याचे दुःख कर्नल एनएस न्यायपती ( निवृत्त) यांच्या पचणी पडत नव्हते, त्यांची पत्नी भूलतज्ज्ञ डॉ.माधूरी न्यायपती यांची साथ घेऊन लोकहितासाठी कर्करोगावर मोफत उपचार देणारं विश्रांती हॉस्पिटल २०१३ साली उभं केलं. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो कर्करोग रूग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. फक्त उपचारच नव्हे तर रूग्णांना जगण्याचं मनोधैर्य, बळ देखील या ठिकाणी दिलं जातं.
पुणे शहरातील सदर बाजार भागात ''केअर इंडिया मेडीकल सोसायटी''च्या माध्यमातून ''विश्रांती हॉस्पिटल'' दाणशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून चालवले जाते.देशभरातील कर्करोग रूग्ण पुरूष -महिला या ठिकाणी येऊन मोफत उपचार घेतात. तोंड, स्तन, गर्भाशय, अंडाशय या ठिकाणी असलेल्या कर्करोगावर उपचार केले जातात. १,२,३,४ असे कर्करोगाचे टप्पे (स्टेज) असतात. पहिल्या तीन स्टेजमध्ये रूग्ण बरा होण्याची शक्यता असते.मात्र चौथ्या स्टेजमध्ये रूणाचे वय, मनोधैर्य, जगण्याची उमेद यावरती उपचार कसे होतील हे अवलंबून असते.स्टेज १,२ वर रूग्ण असेल तर किमोथेरपी (कॅन्सरच्या पेशींना मारून टाकण्यासाठी तसंच कॅन्सर शरीराच्या अन्य भागात पसरू नये यासाठी उपयोगात येणारी औषधप्रणाली) पध्दतीने उपचार केले जातात. रूग्ण वयोवृद्ध असेल तर पॅलिएटिव्ह (उपशामक) पध्दतीने उपचार दिले जातात.
कर्नल एनएस न्यायपती यांनी १९९३ साली ''सतसेवा योजना'' सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन मोफत रूग्णसेवा चालू केली. घरातून रूग्णसेवेचा सुरू झालेला प्रवास आज मोठ्या हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाला आहे.
सातारा, कोल्हापूर, सांगली या भागातील नागरिकांना त्यांच्या जवळपास उपचार मिळावे यासाठी कराड शहरात उपचार केंद्र उभा करण्यात आले आहे.यासाठी निवृत्त अधिकारी, देणगीदार यांची मोठी मदत मिळते.


रूग्णांना कर्करोगाचा त्रास कमी व्हावा, त्यांच्यावर मोफत उपचार करून समुपदेशन व्हावे. दूख कमी व्हावे, आयुष्य आनंदी बनवणं या उद्देशाने पत्नी डॉ.माधुरी यांच्या संकल्पनेतून हॉस्पिटल चालू केले आहे.या ठिकाणी कोमोथेरपीपासून कर्करोगाच्या सर्व ‌प्रक्रिया मोफत केल्या जातात गरजू रुग्णांनी सहभागी व्हावे.
संस्थापक विश्वस्त कर्नल एनएस न्यायपती ( निवृत्त)


दहा महिन्यांपासून मला हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार मिळत आहेत.हॉस्पिटलमध्ये मिळणारी सेवा चांगली आहे. उपचार घेत असल्याने माझा आजार कमी झाला आहे.
- रजिया मेमन सातारा महिला रूग्ण

मला छातीला एका बाजूला गाठ आली होती.विश्रांती हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्जरी करण्यात आली. एक वर्षापूर्वी मी जगेन की नाही अशी माझी अवस्था होती. सध्या माझ्या मुलांसाठी आई म्हणायला म्हणून मी जिवंत आहे.
- जयश्री भालशंकर पुणे महिला रूग्ण


हे रूग्णालय म्हणजे रूग्णांसाठी मंदीर, माहेरघर आहे. रूग्णांना येथे स्वताचे घर असल्याची भावना आहे.कर्करोगाचे उपचार सगळीकडेच मिळतात तसेच येथे आहेत.पण या उपचारमागची भावणा सेवा ही आहे.
- डॉ. अनंतभूषण रानडे कर्करोग तज्ज्ञ

कर्करोगाची लक्षणे

स्तनाचा कर्करोग
स्तनांच्या आकारात बदल,एक किंवा दोन्ही बोंडामधून स्रा,बोंडावर किंवा त्यावरती पुरळ, बोंड आता ओढले जाणे किंवा आकार बदलणे,स्नाग्रस्त पू किंवा रक्तस्राव, स्थनात वेदना किंवा गाठ जाणवणे.

गर्भाशयाचा कर्करोग
रजोनिवृत्तीनंतरही योनिगत रक्तस्राव होणे, प्रसूतीपूर्व रक्तस्त्राव, मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्राव, ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, पोटात गाठ जाणवणे, योनिमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.

तोंडाचा कर्करोग
तोंडात गालाच्या आतल्या बाजूला फोड येणे, तोंडात इजा होणे,ओठ फाटणे आणि जखम सहजासहजी न भरणे, तोंडातून दुर्गंध येणे, आवाज बदलणे, काही गिळण्यास त्रास होणे, जास्त लाळ किंवा रक्त येणे.

अंडाशय कर्करोग
पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटात वेदना, लघवी करताना त्रास, अचानक बद्धकोष्ठता, भूक कमी लागणे, वजन कमी होणे. मासिक पाळीत अनियमितता, लघवीला वारंवार जावे लागणे, ओटीपोटात दुखणे


बुलेट्स
महिलांच्या स्तनांचा, गर्भाशय, अंडाशय, पुरूषांच्या तोंडाचा कर्करोग यावरती मोफत उपचार.
रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन.
दानशूर व्यक्ती, संस्था यांच्या माध्यमातून मिळालेल्या देणगीतून हॉस्पिटल चालते.
दुर्धर आजाराने खचलेल्या रूग्णांना हिंमत मिळते.


फोटो
सदर बाजार: रूग्णांची काळजीपूर्वक विचारपूस करताना कर्नल एनएस न्यायपती ( निवृत्त)