एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकाच दिवशी ३१ हजार 
नवमतदारांची नोंदणी
एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी

एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी

sakal_logo
By

पुणे, ता. १ : जिल्ह्यात युवा नवमतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयांमध्ये एकाचवेळी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांमध्ये ३१ हजार ६४७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीत एकूण ७८ लाख ७६ हजार ९५० मतदार समाविष्ट आहेत. सध्या छायाचित्र मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून, आठ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यात १७ वर्षांवरील भावी मतदारांची आणि १८ वर्षांवरील पात्र युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युवा वर्गाला मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करुन मतदानाच्या हक्काविषयी जागरूक करण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाअंतर्गत ४४२ महाविद्यालयांमध्ये मेगा शिबिर आयोजित करण्यात आले होते. नवमतदारांनी नमुना क्रमांक ६ चा अर्ज भरून शिबिरास चांगला प्रतिसाद दिला. अद्याप नोंदणी न झालेल्या नवमतदारांसाठी ५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व पात्र युवामतदारांना महाविद्यालयातील विशेष शिबिरात नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.