पुण्यात आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात आरोग्य चित्रपट
महोत्सवाचे आयोजन
पुण्यात आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुण्यात आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २ : ‘पीएम शहा फाउंडेशन''तर्फे शुक्रवारी (ता. ९) आणि शनिवारी (ता. १०) अकराव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव विधी महाविद्यालय रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे होणार आहे. महोत्सवाची वेळ पहिल्या दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी सहा असून, दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी सहा अशी असेल. या महोत्सवासाठी प्रवेश विनाशुल्क असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. महोत्सवाचा समारोप अभिनेता ऋषीकेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दृष्टिक्षेपात
- जगभरातून १३०हून अधिक चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता
- त्यापैकी ३१ चित्रपटांची महोत्सवासाठी निवड
- मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य, पर्यावरणीय आरोग्य, बालकांचे शोषण आणि आरोग्य या विषयांवर चित्रपट
- आरोग्याकडे दुर्लक्ष आणि आरोग्य संसाधनांचा अभाव, अवयव दान, व्यसन, घरगुती हिंसाचार अशा विषयांवरील चित्रपटांचा समावेश
- आरोग्यसुविधा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. लीना बोरुडे, चित्रपट निर्माते विनय जवळगीकर आणि शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या अनुजा देवधर यांच्या समितीकडून चित्रपटांची निवड

फाउंडेशनच्या स्थापनेपासून आरोग्यविषयक जनजागृतीसाठी काम करत आहोत. या माध्यमातून तरुणांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या हेतूने महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना पुढे आली.
- अ‍ॅड. चेतन गांधी, संचालक, आरोग्य चित्रपट महोत्सव