आकाशाशी जडवू नाते! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकाशाशी जडवू नाते!
आकाशाशी जडवू नाते!

आकाशाशी जडवू नाते!

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः अथांग विश्वाचे सर्वांनाच कुतूहल असते. तारे, ग्रह, आकाशगंगा, उल्कावर्षाव, अशनी, धूमकेतू हे शब्द ऐकूनच मुलांची उत्सुकता जागृत होते. विद्यार्थ्यांना शालेय वयातच खगोलशास्त्राची, आकाश निरीक्षणाची गोडी लागावी व त्याचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास सुरु करावा या उद्देशाने सकाळ माध्यम समूह आणि कुतूहल-संडे सायन्स स्कूल यांच्यावतीने २४ ते २६ डिसेंबर दरम्यान दोन रात्र व दोन दिवस निवासी आकाशनिरीक्षण शिबिराचे आयोजन अहमदनगरजवळ स्पेस ओडिसी तारांगण येथे करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुतूहल-संडे सायन्स स्कूल या शिबिराचे आयोजन करत आहे. पुणे ते पुणे प्रवासासह व्यवस्था संयोजकांद्वारे करण्यात येते.
या शिबिरादरम्यान एकूण दोन रात्री विद्यार्थी आकाशातील तारे, ग्रह, नक्षत्र -राशी, ध्रुव तारा शोधणे, राशी समूह ओळखणे या पद्धतीने आकाशाची ओळख करून घेतील. याच वेळी उच्च क्षमता असणाऱ्या दुर्बिणीतून देवयानी आकाशगंगा, विविध तारकासमूह, चंद्र, मंगळ, गुरू, आणि शनी या ग्रहांचे निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दुर्बिणी प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठ इंच व १४ इंच कम्पुटराइज्ड दुर्बीण, २० इंच डोबसोनियन दुर्बीण, सोलर दुर्बीण आदी उपकरणांचा उपयोग यासाठी करण्यात येणार आहे. दिवसा विद्यार्थी सूर्याचे निरीक्षण करतील, खगोलशास्त्र हा विषय समजून घेतील तसेच येथे असलेल्या तारांगणामध्ये ‘‘इन्वेडर्स ऑफ मार्स’’ हा शो त्यांना दाखविला जाणार आहे. वय वर्ष १० व त्यापुढील विद्यार्थी व इतर व्यक्ती या शिबीरात सहभागी होऊ शकतात. मुला-मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असून मुलींसोबत संयोजकांकडून दोन महिला प्रशिक्षक शिबिरात राहतात. शिबिरात विद्यार्थ्यांबरोबर मराठी-हिंदी-इंग्रजी भाषांमध्ये संवाद केला जाईल तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिबिरासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

हे लक्षात ठेवा
तारखा : २४ ते २६ डिसेंबर २०२२
शुल्क: प्रवास, नाश्ता-जेवण, निवास, प्रशिक्षणासहित ३९०० रुपये प्रति व्यक्ती
नोंदणीसाठी सुरुवातीची रक्कम - १५०० रुपये (बाकी शुल्क शिबीरापूर्वी भरायचे आहे)
प्रवेशासाठी संपर्क : ९३७३०३५३६९/८७७९६७८७०९