दत्त जयंती सप्ताहनिमित्त आज ‘सप्तस्वरोत्सव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दत्त जयंती सप्ताहनिमित्त
आज ‘सप्तस्वरोत्सव’
दत्त जयंती सप्ताहनिमित्त आज ‘सप्तस्वरोत्सव’

दत्त जयंती सप्ताहनिमित्त आज ‘सप्तस्वरोत्सव’

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः पुण्यातील दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेट हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट च्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व श्री दत्त जयंती सप्ताहनिमित्त शनिवारी (ता. ३) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ७.३० ते रात्री १०.०० या वेळेत मराठी चित्रपटातील भाव-भक्ती गीतांच्या सप्तस्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्तस्वरोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटातील भाव-भक्ती गीतांचा आनंद पुणेकरांना लुटता येणार आहे. मराठीतील प्रसिद्ध गायिका प्रतिभा थोरात, त्यागराज खाडिलकर, हेमंत वाळुंजकर, भाग्यश्री अभ्यंकर आदी सप्तस्वरोत्सवात मराठीतील विविध गीते व गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच, मराठी चित्रपट सृष्टीतील भाव व भक्ती गीतांचा प्रवास उलगडणार आहेत. रशीद शेख, अमन सय्यद, हार्दिक रावल, सचिन वाघमारे, ऋतुराज कोरे व नितीन शिंदे वाद्यवृंद म्हणून त्यांना साथ देणार आहेत.
सप्तस्वरोत्सव कार्यक्रम सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विनामूल्य असून, श्री दत्त जयंती सप्ताहनिमित्त ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेट हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी व कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार यांनी दिली.