आदिवासी समाजजीवनावर संशोधनाची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी समाजजीवनावर संशोधनाची संधी
आदिवासी समाजजीवनावर संशोधनाची संधी

आदिवासी समाजजीवनावर संशोधनाची संधी

sakal_logo
By

पुणे, ता. २ : आदिवासी समाज हा निसर्गाशी शेकडो वर्षापासून जोडलेला आहे. त्यातून त्यांची संस्कृती, कला, औषधी वनस्पतींची जाण, जल-जंगल-जमीन साठी त्यांचा संघर्ष हा जगासमोर येत त्यावर पुढील काळात संशोधन होणे गरजेचे आहे. असा सूर नुकत्याच आयआयटी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत उमटला, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्यातर्फे ‘आदिवासी संशोधन- अस्मिता, अस्तित्व आणि विकास’ या विषयावर दिल्ली येथील विज्ञान भवन, आयआयटी दिल्ली व राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेला विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ.जगदीश कुमार व राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान, सचिव अल्का तिवारी, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदचे अध्यक्ष डॉ.जे.के.बजाज, देशभरातून १०४ विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.