Wed, March 29, 2023

पथनाट्याद्वारे एड्सविषयी जागरूकता
पथनाट्याद्वारे एड्सविषयी जागरूकता
Published on : 2 December 2022, 2:09 am
पुणे, ता. २ : जागतिक एड्स दिनानिमित्त (१ डिसेंबर) मुक्ती उद्धारण सेवा ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या सभासदांनी शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करीत एड्सविषयी जागरूकता केली. तसेच रॅलीचेदेखील आयोजन केले होते. रॅली सावित्रीबाई फुले बचत गट भवन येथून सुरू झाली. विजय मारुती चौक, रामेश्वर मार्केट येथे सार्वजनिक सभागृहात रॅलीची सांगता झाली. पुणे सार्वजनिक सभागृहाचे ट्रस्टी सुरेश कालेकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. अलका फाउंडेशन, पुणे महानगर आरोग्य विभाग, सहेली, वंचित विकास संस्था, मंथन, रिलिफ फाउंडेशन या संस्था रॅलीत सहभागी झाल्या होत्या. रेजी थॉमस यांनी आभार मानले.