जर्मनी ड्युअल पदवीबाबत कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जर्मनी ड्युअल पदवीबाबत कार्यशाळा
जर्मनी ड्युअल पदवीबाबत कार्यशाळा

जर्मनी ड्युअल पदवीबाबत कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. २ : जर्मनी ड्युअल पदवी कार्यक्रमाबाबत प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे सोमवारी (ता. ५) दुपारी अडीच वाजता कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेत २०२२ या शैक्षणिक वर्षामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अन्न उत्पादन, फूड ॲण्ड बिवरेज सेवा, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक्स, बिल्डिंग कंस्ट्रक्शन, प्लंबर, सुतार, वेल्डर अभ्यासक्रमात उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम विद्यार्थी, आजी-माजी प्रशिक्षणार्थी, अप्रेंटिसशिप उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.

अधिक माहितीसाठी लियोस सॅगिटॅरियस कन्सल्टिंगच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक कवी लुथरा (९९२००४००४२) आणि पी. एस. वाघ (९२२४३२४८९३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.