भारतीय हवाईदलात नोकरीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय हवाईदलात नोकरीची संधी
भारतीय हवाईदलात नोकरीची संधी

भारतीय हवाईदलात नोकरीची संधी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : भारतीय हवाईदलात जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी. हवाईदलाच्या वतीने घेतली जाणारी ‘एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट’साठी (एएफकॅट) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजेच ही प्रक्रिया महिला व पुरुष या दोन्ही उमेदवारांसाठी असून हवाईदलाच्या विविध विभागात अधिकारीपदासाठी एएफकॅट प्रक्रिया वर्षातून दोन वेळा घेण्यात येते.

हे आहेत टप्पे
- लेखी परीक्षा
- सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एफएसबी)
- वैद्यकीय चाचणी

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा
- फ्लाइंग शाखा (वयोमर्यादा २० ते २४ वर्ष)
- ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) (वयोमर्यादा २० ते २६ वर्षे)
- पदवी, अभियांत्रिकीची पदवी, पदव्युत्तर पदवी उमेदवारांना संधी

असा करा अर्ज
- एएफकॅटच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
- संकेतस्थळावर ‘एएफकॅट- २०२३ साठी नोंदणी’च्या विकल्पावर क्लिक करा
- उमेदवारांनी सर्व माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी
एएफकॅटसाठी देशातील विविध केंद्रांमध्ये २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना afcat.cdac.in किंवा careerairforce.nic.in या संकेतस्थळांचा वापर करता येईल.


----------