लक्ष्मणराव आपटे प्रशाला द्वितीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मणराव आपटे प्रशाला द्वितीय
लक्ष्मणराव आपटे प्रशाला द्वितीय

लक्ष्मणराव आपटे प्रशाला द्वितीय

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ यांच्यावतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘भारताचा देदीप्यमान अपरिचित इतिहास’ विषयावर शिक्षकांसाठी आंतरशालेय सांघिक प्रदर्शनी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची साताऱ्यातील कन्या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका डॉ. नेहा बेलसरे, डॉ. शशिकांत जोशी, महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. वामन गोगटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. स्पर्धेत विद्या महामंडळ संस्थेच्या लक्ष्मणराव आपटे प्रशाला आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (पेरूगेट) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. तर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वडगाव शेरी येथील व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूल, खडकी शिक्षण संस्थेची गुलबाई मुलुक इराणी कन्याशाळा, संस्कृत विद्या मंदिर संस्थेची विद्या विकास प्रशाला (सहकारनगर) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाची पारितोषिके मिळविणाऱ्या शाळांचे स्पर्धेतील प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. गणेश चव्हाण, डॉ. सारिका बहिरट, विजय थत्ते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा समिती अध्यक्षा स्वाती भावे यांनी, तर सूत्रसंचालन सुप्रिया माने यांनी केले. कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक सुजित जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.